मुंबई : शिंदे आणि फडणवीस सरकारचा अखेर आज मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. या मंत्रिमंडळात भाजपचे 10 ते 11 आणि एकनाथ शिंदेंसोबत असलेल्या 6-7 मंत्र्यांचे शपथविधी होऊ शकतात. भाजपकडून शपथ घेणाऱ्या 9 मंत्र्यांची नावं आता समोर आली आहेत.
यामध्ये चंद्रकांतदादा पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, सुरेश खाडे, अतुल सावे, मंगलप्रभात लोढा, रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावीत यांना आतापर्यंत फोन गेला आहे.
भाजपच्या या 9 जणांशिवाय शिवसेना शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील, दादा भुसे, उदय सामंत आणि संजय शिरसाट यांना निरोप देण्यात आलेला आहे. उर्वरीत आमदारांनी कोर्टाच्या निकालानंतर शपथ दिली जाणार असल्याची शक्यता आहे.
तर मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर येत्या काही दिवसांमध्ये विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन होणार आहे. सरकार स्थापन झाल्यानंतरचं हे पहिलंच मोठं अधिवेशन असणार आहे, त्यामुळे हे अधिवेशन वादळी ठरणार हे मात्र निश्चित आहे.
शिंदे गटातील गुलाबराव पाटील यांनी घेतली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ, मागील सरकारमध्येही होते कॅबिनेट मंत्री
भाजपकडून गिरीश महाजन यांनी घेतली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ
भाजपकडून विजयकुमार गावित यांनी घेतली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ
भाजपकडून चंद्रकांत पाटील यांनी घेतली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ
राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ
शिंदे गटातील दादा भुसे यांनी घेतली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ, मागील सरकारमध्ये होते कृषी मंत्री
शिंदे गटातील उदय सामंत यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ
शिंदे गटातील तानाजी सावंत यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ, फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री