मुंबई : शिंदे भाजप सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या सकाळी ११ वाजता होणार असल्याची दाट शक्यता आहे.या विस्तारात भाजप आणि शिंदे गटातील एकूण 20 ते 25 आमदारांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. त्यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देखील मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. भाजपकडून त्यांना फोन गेलाय आणि त्यांना मुंबईत दाखल होण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची माळ आता आमदार आशिष शेलार यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता आहे
चंद्रकांत पाटील यांना मंत्रिपद दिल्यास, प्रदेशाध्यक्षपद दुसऱ्याकडे दिलं जाऊ शकतं, अशी चर्चा भाजपच्या वर्तुळात सुरु होती.
अशावेळी मुंबई महापालिका निवडणूक आणि आशिष शेलार यांचं संघटन कौशल्य लक्षात घेत पक्षश्रेष्ठींनी भाजप प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी शेलार यांच्याकडे देण्याचं निश्चित केल्याचं सांगितलं जात आहे. आता पाटील यांचं नाव मंत्रिपदासाठी नक्की झाल्यामुळे शेलारांकडे भाजप प्रदेशाध्यक्षपद दिलं जाईल, अशी चर्चा भाजपच्या गोटात सुरु आहे.