मुंबई । राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार गेल्या महिनाभरापासून रखडला होता. मात्र, आता उद्याच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती मिळतेय. यामध्ये दोन्ही गटाकडून अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश केला जाईल. चला आपण जाणून घेऊया नेमकं कोणाकोणाला मंत्रिपदाची संधी मिळू शकते.
प्रामुख्याने ठाकरे सरकारमध्ये शिवसेनेकडून जे मंत्री होते त्यांचं मंत्रिपद या सरकारमध्येही कायम राहण्याची शक्यता आहे. यामध्ये शंभूराज देसाई, संदीपान भुमरे, दादा भुसे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, बच्चू कडू यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त संजय शिरसाठ, शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर तसेच मुख्य प्रदोत भरत गोगावले यांनाही मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर नुकतंच टीईटी घोटाळ्यात नाव समोर आल्याने अब्दुल सत्तार यांच्या अडचणी वाढल्या आहेत, सत्तार याना मंत्रिपद मिळेल कि नाही याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.
तर दुसरीकडे भाजपकडूनही पहिल्या फळीतील नेत्यांना प्रामुख्याने संधी मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील, नितेश राणे, चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, रवी राणा, संजय कुटे, रवींद्र चव्हाण यांचा समावेश नव्या मंत्रिमंडळात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे भाजप कशाप्रकारे मंत्रिमंडळ विस्ताराबाबत समतोल साधतो हे आता उद्या पाहावं लागेल.
संभाव्य यादी-
शिंदे गट
शंभूराज देसाई
संदीपान भुमरे
दादा भुसे
गुलाबराव पाटील
उदय सामंत
बच्चू कडू
संजय शिरसाठ
दीपक केसरकर
भरत गोगावले
हे पण वाचा :
मुक्ताईनगर तालुक्यातील जवान विपीन खर्चे यांना वीरमरण
मी 9 मुलांना डेट केले पण… लैंगिक संबंधांबाबत 35 वर्षीय महिलेने केला मोठा खुलासा
ब्रेकिंग ! उद्या शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार? इतक्या मंत्र्यांचा होणार शपथविधी
खळबळजनक ! आठवीत शिकणाऱ्या मुलीवर लैंगिक अत्याचार
भाजप –
गिरीश महाजन
सुधीर मुनगंटीवार,
राधाकृष्ण विखे पाटील
नितेश राणे
चंद्रकांत पाटील
प्रवीण दरेकर
रवी राणा
संजय कुटे
रवींद्र चव्हाण