मुक्ताईनगर | तालुक्यातील निमखेडी येथील मूळ रहिवासी तथा सैन्यदलात नायब सुभेदार म्हणून कार्यरत असणारे विपीन जनार्दन खर्चे यांना वीरगती प्राप्त झाली आहे. सेवा बजावत असताना विपीन खर्चे यांच्या गाडीचा अपघात झाल्याने त्यांना हौतात्म्य प्राप्त झाले. यामुळे निमखेडी गावात शोककळा पसरली आहे.
नायब सुभेदार विपीन खर्चे हे जम्मू-काश्मिर येथे सेवा बजावत होते. दरम्यान ते उधमपूर येथे सेवेत असताना त्यांचे वाहन दरीत कोसळल्याने त्यांना विरमरण प्राप्त झाले आहे. त्यांचे पार्थिव गावी आल्यानंतर त्यांच्यावर शासकिय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेले मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी बु. येथील जवान विपीन जनार्दन खर्चे यांना नायब सुभेदार JCO पदावर कर्तव्यावर असतांना वीरगती प्राप्त झाली. शहिद वीर विपीन खर्चे यांना भावपूर्ण श्रद्धांजली व शत शत् नमन! pic.twitter.com/RBWf66ZZCV
— Eknath Khadse (@EknathGKhadse) August 8, 2022
दरम्यान, जवान विपीन जनार्दन खर्चे यांना वीरगती प्राप्त झाले आहे. त्यांना राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी अभिवादन केलं आहे. तसेच राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणीताई खडसे यांनी देखील आपल्या सोशल मीडिया प्रोफाईलवरून विपीन खर्चे यांना हौतात्म्य प्राप्त झाल्याची माहिती दिली आहे.