मुख्यमंत्र्यांनी विमा कंपन्यांची बैठक बोलावली होती. त्या कंपन्यांना पंचनामा करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झालं आहे. त्याव्यतिरिक्त नाशिक, नागपूरसह कोकणातही पिके, फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे. पंचनाम्याला विलंब लागत असेल तर शेतकऱ्यांनी त्यांच्या मोबाइल फोनवरुन फोटो अपलोड केले तरी चालतील असे आवाहन मुख्यमंत्री यांनी केले आहे. उद्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक बोलवली असून कशा स्वरुपाची तात्काळ मदत करता येईल, याचा आढावा घेण्यात येईल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
दरम्यान, शिवसेनेच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेऊन महाराष्ट्रात ओला जाहीर करण्याची मागणी केलीय. तर महाराष्ट्रातील नुकसानाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक लवकरच दाखल होणार आहे. पाऊस, वादळ व अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी राज्यात लवकरच केंद्रीय पथक पाठवण्यात येईल, असं केंद्रीय गृहमंत्री शहा यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना सांगितलं. राज्यपालांनी शहा यांना फोन करून राज्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती गुरुवारी दिली. यानंतर शाह यांनी राज्यपालांना केंद्रीय पथक पाठवण्याचं आश्वासन दिलं.