जळगाव : राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर जळगावामध्ये भाजपचे नेते गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यामध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. संजय राऊत यांच्यानंतर पुढचा नंबर हा एकनाथ खडसे यांचा असणार आहे, असा दावाच महाजनांनी केला होता. आता यावर एकनाथ खडसे यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले.
कोणी म्हणते नाथाभाऊ तुरुंगात जाईल जायचंय तुरुंगात जाईल. मात्र माझं एक वाक्य लक्षात ठेवा ‘हम तो डुबेंगे सनम लेकिन तुमको भी साथ लेके डुबेंगे’ असं म्हणत खडसे यांनी गिरीश महाजन यांचं नाव न घेता कडक इशारा दिला.
ईडी नावाचा प्रकार आता घरोघरी पोहोचला आहे. माझ्यामागे ईडी लागली, सीबीआय लागली, अँटी करप्शन लागलं असेल नसेल ते लागलं काय झालं काहीच नाही. विरोधकांना उठलं की फक्त नाथाभाऊच दिसतो. कोणी म्हणते नाथाभाऊ तुरुंगात जाईल, जायचंय तर तुरुंगात जाईल. मात्र माझं एक वाक्य लक्षात ठेवा ‘हम तो डुबेंगे सनम लेकिन तुमको भी साथ लेके डुबेंगे’ असं म्हणत खडसेंनी महाजनांवर जोरदार पलटवार केला.