नागपूर – मुलीच्या शरीरात झालेली कथित भूतबाधेतून मुक्त करण्याच्या नादात जन्मदात्या आई- वडिलांनीच पाच वर्षांच्या चिमुकलीला बेदम मारहाण केल्याचे धक्कादायक घटना समोर आली असून या घटनेत त्या निष्पाप मुलीचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली असून या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे.नागपूर शहरातील प्रतापनगर परिसरातील कामगार कॉलनीत शनिवारी दुपारी हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
मुलीला बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओही केला होता तयार….
आरोपींनी मुलीला बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओही तयार केला होता. हा व्हिडीओ समोर आल्या नंतर आरोपींच्या क्रूर कृत्याच्या पुरावा मिळाला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात गुरुपौर्णिमेला सिद्धार्थ आणि रंजना आपली लहान मुलगी अनक्षी आणि शनिवारी दुपारी आरोपी मुलीला घेऊन मेडिकलला गेले. तेथे मुलीच्या शरीरावर जखमा पाहून डॉक्टरांना शंका आली. त्यांनी चौकशी केली असता आरोपी भीतीने पळून गेले. त्यानंतर डॉक्टरांनी पोलिसांना सूचना दिली. वरिष्ठ पोलीस अधिकारी मेडिकलमध्ये पोहोचले. आरोपींनी काउंटरवर आपले पूर्ण नाव आणि पत्ता नोंदविला नव्हता; परंतु तिघांना रुग्णालयाबाहेर संशयास्पदरीत्या पळताना पाहून सुरक्षारक्षकाने मोबाइलमध्ये त्यांचा फोटो काढला. फोटोत गाडी क्रमांक दिसल्यामुळे पोलिसांनी आरोपींना शोधून ताब्यात घेतले.
या तिघांना केली अटक…..
वडील सिद्धार्थ प्रल्हाद चिमणे (४५), आई रंजना सिद्धार्थ चिमणे (४१, दोघे रा. कामगारनगर) आणि मावशी प्रिया अमर बन्सोड (३५, भिवापूर) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी वडील सिद्धार्थ एक यू-ट्यूब चॅनल चालवितात. आरोपींनी मुलीला बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओही तयार केला होता. यामुळे आरोपींच्या क्रूर कृत्याच्या पुरावा मिळाला आहे.
बाप , व्हिडीओत दिसला अमानवी कृत्य करतांना…
आरोपींच्या मोबाइलची तपासणी केली असता मुलीसोबत झालेल्या अमानवी मारहाणीचा व्हिडीओ आढळला. पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा आरोपींना अटक करून खून, महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे…
मोठ्या मुलींना घेऊन टाकळघाटच्या दरगाहला गेले होते. तेथून परतल्यानंतर अनक्षीने भोजन करणे बंद केले. दाम्पत्याला मुलीच्या वागणुकीत बदल झाल्याची शंका आली. त्यांनी मुलीला भूतबाधा झाल्याचा समज करून घेत तिला काळ्या जादूने बरे करण्याचे ठरविले. शुक्रवारी रात्री कथित झाडफुक केल्यानंतर आरोपींनी अनक्षीला चामड्याच्या बेल्टने बेदममारहाण सुरू केली. काही वेळानंतर चिमुकली बेदम मारहाणीमुळे बेशुद्ध झाली. तिला ते रुग्णालयातही घेऊन गेले नाहीत. शनिवारी सकाळी आरोपी तिला उमरेडच्या एका दरगाहमध्ये घेऊन गेले. तेथे मुलीच्या शरीरातून आत्मा पळविण्याची प्रार्थना करून परत आले; परंतु उमरेडवरून परतल्यानंतर मुलीच्या