मुंबई : सध्या बंगालच्या उपसागरापासून ते आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीपर्यंत हवेच्या वरच्या भागात द्रोणीय स्थिती तयार झाली होती. त्यामुळे राज्यात पाऊस सक्रिय झाला आहे. राज्यातील काही भागात मागच्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. अशातच कोकण, मध्य महाराष्ट्रासह, विदर्भ, मराठवाड्यात पावसाने काही जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसल्या दरम्यान पुढे चार दिवस राज्यातील कोल्हापूर, सातारा, पुणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, मुंबई, नाशिक, ठाणे, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या भागांत 9 ऑगस्टपर्यंत हवामान विभागाने ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे.
या भागांत अतिमुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, उर्वरित भागातही मुसळधार पाऊस पडणार आहे. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. बंगालच्या उपसागरातील मध्य पूर्व आणि उत्तर पश्चिम भागात 7 ऑगस्टला कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे.
कोल्हापूर, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नाशिक, पुणे (घाटमाथा), सातारा, औरंगाबाद, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या भागात 6 ते 9 ऑगस्ट या भागांत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हे देखील वाचा :
फोटोच्या नादात तरुण धबधब्यात वाहून गेला, अंगाला काटा आणणारा Video व्हायरल
जर तुमच्याकडे ‘ही’ पदवी असेल तर तुम्हाला LIC मध्ये मिळेल नोकरी, 53,620 रुपये पगार मिळेल
खळबळजनक ! धुळ्यात गोळीबार करत तरुणाचा खून
काळीज हेलावून टाकणारी घटना ; 7 वर्षांच्या मुलीचं अपहरण करुन बलात्कार आणि हत्या!
जळगाव जिल्ह्यात देखील मंगलवारपर्यंत पावसाचा जोर राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे. गेल्या एकही दिवसापासून पावसाने उघडदीप दिल्याने जिल्ह्यात उन्हाचा उकाडा वाढला होता. मात्र गुरुवारी पावसाचे पुनरागम झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.