अलीकडच्या काळातील तरूणाई उत्साहाच्या भरात अशा काही गोष्टी करते, ज्या कधीकधी त्यांच्या अंगलट येतात. नको ते साहस करण्याच्या प्रयत्नात अनेक तरूण-तरूणींना आपला जीव गमवावा लागतो. अशीच एक धक्कादायक घटना तामिळनाडूमधील कोडाईकनाल जिल्ह्यामधून समोर आलीय. धबधब्यावर फोटो काढण्याच्या नादात एक 28 वर्षीय तरूण तोल जाऊन धबधब्यात कोसळला आणि पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला.
ही संपूर्ण घटना या तरुणाच्या मित्राच्या कॅमेरात कैद झाली आहे. अजय पंडियन असे धबधब्यात वाहून (boy drowned in waterfall) गेलेल्या तरुणाचे नाव असून तो अद्यापपर्यंत बेपत्ता आहे. तो अजूनही बेपत्ता आहे.अग्निशमन दलाच्या बचाव पथकाकडून त्याचा शोध सुरु आहे.
फोटोच्या नादात धबधब्यात वाहून गेला तरूण, Video आला समोर pic.twitter.com/aB3txUhGYe
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) August 6, 2022
अजय पंडियन नावाचा युवक फोटोसाठी पोज देताना धबधब्यात पडला आणि बेपत्ता झाला. ही संपूर्ण घटना त्याच्या मित्राच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडीओ नंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अजय धबधब्याच्या अगदी जवळ जाऊन तो विविध पोज देत असल्याचं दिसत आहे. दरम्यान तो पोझ करत करत धबधब्याच्या अगदी जवळ पोहोचल्याचं व्हिडीओत दिसत आहे.