बंगलोर : आई ही मुलांची सर्वात मोठी रक्षक मानली जाते. कारण आई फक्त मुलाला जन्म देत नाही तर त्याचे संगोपनही करते. आई आणि मुलाच्या प्रेमावर बरंच काही लिहिलं गेलं आहे, मात्र कर्नाटकातून मन सुन्न करणारा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये महिलेने आपल्या चार वर्षाच्या मुलीला चौथ्या मजल्यावरून खाली फेकले. यात चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ तिथे लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. उत्तर बेंगळुरूच्या एसआर नगरमधील एका अपार्टमेंटमध्ये ही भीषण घटना घडली.
पोलिसांनी सांगितले की, चार वर्षांची मुलगी ऐकू आणि बोलू शकत नाही. त्यामुळे महिला नैराश्यात असल्याचे पोलिसांनी सांगितले. पतीने पोलिसांत गुन्हा दाखल केल्यानंतर तिला अटक करण्यात आली आहे.
हे देखील वाचा :
जर तुमच्याकडे ‘ही’ पदवी असेल तर तुम्हाला LIC मध्ये मिळेल नोकरी, 53,620 रुपये पगार मिळेल
खळबळजनक ! धुळ्यात गोळीबार करत तरुणाचा खून
काळीज हेलावून टाकणारी घटना ; 7 वर्षांच्या मुलीचं अपहरण करुन बलात्कार आणि हत्या!
स्वातंत्र्य दिनापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने सरकारकडून मागितले ‘हे’ ‘गिफ्ट’, काय शक्य होईल?
ती महिला डेंटिस्ट आहे आणि तिचा नवरा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी श्रीनिवास गौडा यांनी सांगितले की, आम्ही आईच्या मानसिक आरोग्याबाबत सर्व बाजूंनी विचार करत आहोत.