- नाशि कः- नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या कृषी राज्यमंत्री सदाभाऊंसमोरच शेतकऱ्यांना रडू कोसळले. परतीच्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. सरकारने त्वरीत मदत करावी, अशी मागणी यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि धनंजय मुंडे हे आज नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. पवार आणि मुंडेंच्या भेटीआधीच कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत नाशिकमध्ये थडकले. नाशिकजवळ असलेल्या वडाळी भोई गावात जाऊन खोत यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागांची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले. घाम गाळून कमावलेलं पिक पावसामुळे मातीमोल झाल्यानं शेतकरी रडले. आता माय बाप सरकारने मदत करावी, अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली. तर ‘येत्या आठ दिवसांत पंचनामा पूर्ण करून मदत दिली जाईल, असं आश्वासन सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांना दिलं. तसंच पंचनामा करण्यास दिरंगाई झाली तर संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात येईल’, असा दिलासाही त्यांनी शेतकऱ्यांना दिला.
नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. पावसामुळे द्राक्ष, कांदा, भाजीपाल्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील सुमारे साडे तीन लाख हेक्टरवरिल पिकांचे पावसामुळे नुकसान झाले आहे. मालेगाव, नांदगांव, चांदवड, सिन्नर, निफाड या तालुक्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. मका, सोयाबीन, द्राक्ष आणि कांद्याचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.