धुळे : धुळे शहरातली कुमार नगर परिसरात गोळीबार करत तरुणाची हत्या करण्यात आली आहे. चिनू उर्फ चंद्र राजेंद्र पोपली असे गोळीबारात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आर्थिक देवाणघेवाणीतून ही हत्या झाली असल्याचा संशय व्यक्त केला जात असून याप्रकरणी दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नेमकं काय घडलंं?
शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली. या घटनेनंतर आता पोलिसांकडून हत्याप्रकरणाचा कसून तपास केला जातो आहे. पैशांच्या वादातून ही हत्या झाली असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. पवन नावाच्या व्यक्तीने या हत्येबाबत माहिती दिली आहे. पवन हा हत्या झाली तेव्हा घटनास्थळी होता. त्याने ही संपूर्ण घटना पाहिली असून या हत्याकांडाच्या घटनाक्रमाबाबत त्याने सविस्तर माहिती पोलिसांनी दिलीय.
हे देखील वाचा :
काळीज हेलावून टाकणारी घटना ; 7 वर्षांच्या मुलीचं अपहरण करुन बलात्कार आणि हत्या!
स्वातंत्र्य दिनापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने सरकारकडून मागितले ‘हे’ ‘गिफ्ट’, काय शक्य होईल?
मोदींच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे राजीनामा देणार होते, पण …; केसरकरांचा मोठा गौप्यस्फोट
वहिनींसोबत तिघांनी अभद्र भाषेत बाचतीत केली होती. चिनूवर हल्ला करण्याआधी तिघे हल्लेघोर घरी गेले होते. आम्ही सगळे चौकत येऊन बसलो होतो.त्यावेळी तिघांनी येऊन हल्ला केला. त्याआधी तिघांनी तरुणाच्या घरावरही धडक दिल्याचं कळतं. तिथं काही सापडलं नाही म्हणून तिघा हल्लेखोरांनी येऊन विचारणा केली, असं पवन या तरुणानं म्हटलंय.