मुंबई : सध्या महाराष्ट्रात सुरु असलेल्या सत्तासंघर्षात कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गुरुवारी रात्री भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, एकनाथ शिंदे आणि उज्ज्वल निकम यांची भेट नक्की कोणत्या कारणासाठी होती, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, सध्या सर्वोच्च न्यायालयात शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे गटात कायदेशीर लढाई सुरु आहे. त्याच अनुषंगाने एकनाथ शिंदे आणि उज्ज्वल निकम यांच्यात चर्चा झाली असावी, असा अंदाज बांधला जात आहे.
गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास उज्ज्वल निकम हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ‘नंदनवन’ या निवासस्थानी आपल्या काही सहकाऱ्यांसोबत पोहचले. सर्वोच्च न्यायालयामध्ये झालेली सुनावणी आणि सोमवारी होणाऱ्या पुढील सुनावणीसंदर्भात कायदेशीर बाजू समजून घेण्यासाठी, त्याचं विश्लेषण करण्यासाठी, हे प्रकरण पुढे कशाप्रकारे हाताळलं जाऊ शकतं याबद्दलची कायदेशीर माहिती जाणून घेण्यासाठी उज्ज्वल निकम यांना मुख्यमंत्री शिंदेंनी आपल्या निवासस्थानी बोलावलं होतं, अशी माहिती टीव्ही ९ ने दिली आहे.
हे देखील वाचा..
शेतकऱ्यांनो काळजी घ्या ; पुढचे 8 दिवस राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना इशारा
वनरक्षक विवाहितेने प्रियकराच्या साथीने काढला पतीचा काटा, असा झाला उलगडा
कच्चे दूध पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की हानिकारक? सत्य काय आहे ते जाणून घ्या
नौदलात 10वी पास उमेदवारांना नोकरीची मोठी संधी.. जाणून घ्या तपशील
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उज्ज्वल निकम यांच्यामध्ये बराच वेळ चर्चा झाली. शिवसेना कुणाची, शिवसेनेचं निवडणूक चिन्हं कोणाला मिळू शकतं यासंदर्भात सुरु असलेल्या खटल्यात पुढं काय होऊ शकतं, यासंदर्भातील घडामोडी कशा घडू शकतात याबद्दल दोघांमध्ये चर्चा झाल्याचं सांगितलं जातंय. या खटल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व कायदेशीर बाबी जाणून घेण्याच्या दृष्टीने शिंदे आणि निकम यांची ही भेट झाल्याचं सांगण्यात येत आहे.