कुठल्याही स्थितीत शिवसेनेला पाठिंबा देणार नाही. तसंच भाजप-शिवसेनेत सुरू असलेली रस्सीखेच हा निव्वळ ‘दिखावा’ आहे. २०१४ ची निवडणूक आणि २०१९ ची निवडणूक पूर्णपणे वेगळी आहे. त्यावेळी सर्वच पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवली. पण आता महाआघीडी आणि महायुती करून निवडणूक लढवली गेली. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस भाजपला पाठिंबा देणार नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं.
जनतेने आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला आहे. तसंच भाजप आणि शिवसेनेनं आपल्यातील भांडणं मिटवावीत. भाजप-शिवसेनेत जे काही सुरू आहे हे फक्त नाटक आहे. ते सत्ता स्थापन करतील आणि त्यांनीच सत्तेत यावं. काही मतभेद असतील तर दूर करावेत. आम्ही कुठल्याही पक्षाशी चर्चा करणार नाही. आम्हाला विरोधात बसण्याचा कौल मिळालाय. परिस्थिती बदललीच तर त्यावेळी ठरवू, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.