मुंबई: गेल्या काही दिवसापूर्वी गोरेगावच्या पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडी (ED) अटक केली होती. त्यांना ४ ऑगस्टपर्यंत कोठडी देण्यात आली होती. दरम्यान, या कोठडीची मुदत आज संपणार असून त्यांच्या जामिनावर आज सुनावणी होणार आहे. त्यामुळे त्यांना आज जामीन मिळणार की तुरुंगातच राहावे लागणार हे पाहावे लागणार आहे.
अटकेनंतर दुसऱ्या दिवशी राऊत यांना आधी जेजे रुग्णालयात नेण्यात आलं होतं. जेजेत वैद्यकीय चाचणी केल्यानंतर दुपारी त्यांना कोर्टात (court) हजर करण्यात आलं होतं. यावेळी ईडीकडून राऊत यांच्या सात दिवसांच्या ईडी कोठडीची मागणी करण्यात आली होती. राऊत यांच्या वकिलाने त्याला विरोध केला होता. त्यानंतर कोर्टाने राऊत यांना तीन दिवसाची ईडी कोठडी सुनावली होती.
हे पण वाचा :
आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ निर्णय
अरे वा.. 1 लाख रुपयांहुन कमी किमतीत घरी आणा ही कार, पण कशी?.. घ्या जाणून
आतापर्यंत गुलाब पाहिले, आता काटे पाहा; उद्धव ठाकरेंचा गुलाबरावांसह भाजपवर निशाणा
शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घरावर ईडीने छापेमारी करून तब्बल 9 तास झाडाझडती घेतली होती. राऊत यांच्या भांडूप येथील बंगल्यात ही धाड मारण्यात आली होती. त्याचवेळी राऊत यांच्या दादरमधील गार्डन कोर्ट फ्लॅटवरही छापा मारण्यात आला होता. तसेच गोरेगाव येथेही छापा मारण्यात आला होता. त्यानंतर राऊत यांना ईडीच्या कार्यालयात नेण्यात आले होते. तिथेही राऊत यांची चौकशी करून रात्री 12 वाजून 40 मिनिटांनी त्यांची अटक करण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी त्यांना कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्यांना तीन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती. राऊत यांची कोठडी आज संपत असल्याने त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.