मुंबई : राज्यात सध्या पावसाने उघडीप दिली आहे. मात्र अशातच पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने पुढचे ४ दिवस राज्यात असेच हवामान राहील पण रविवारी अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस हजेरी लावेल अशी माहिती दिली आहे. त्यामुळे नागरिकांना रविवारपर्यंत उन्हाच्या झळा सोसाव्या लागणार आहेत.
राज्यात काही भाग वगळता पावसाचा जोर कमी झाला आहे. मुंबईसह, ठाणे, परिसरात आज पावसाने हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पावसाने उघडीप दिल्याने उष्णतेत वाढ झाली होती. मात्र, रात्री पाऊसाच्या सरी कोसळल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. दरम्यान, येत्या चार दिवसांत राज्याच्या विविध भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रासह घाट परिसरात, काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच जळगाव जिल्ह्याला पुढील दोन दिवस यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हे पण वाचा :
अरे वा.. 1 लाख रुपयांहुन कमी किमतीत घरी आणा ही कार, पण कशी?.. घ्या जाणून
आतापर्यंत गुलाब पाहिले, आता काटे पाहा; उद्धव ठाकरेंचा गुलाबरावांसह भाजपवर निशाणा
भारतीय स्टील प्राधिकरणात 200 पदांवर भरती ; या पद्धतीने करा अर्ज?
सर्वसामान्यांसाठी खुशखबर.. अनेक तेलांचे दर घसरले
पुन्हा पाऊस सक्रिय होणार
राज्यातील अनेक भागात आषाढी एकादशीपासूनच पावसाने चांगलाच जोर धरला होता. मात्र, काही भागात पावसाने उघडीप दिल्याने शेती काम करण्यास मुभा मिळाली. यादरम्यान शेतकऱ्यांनी आपले खुरपणी, वखरणी, खते टाकणे अशी कामे उकरुन घेतली आहे. राज्यात आता पुन्हा पाऊस सक्रिय होणार असून, येत्या चार दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.