मुंबई : राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतुत्वाखाली सरकार स्थापन होऊन महिना उलटून गेलाय. मात्र अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यामुळे विरोधकांकडून राज्य सरकारवर जोरदार टीका करण्यात येतेय. अशावेळी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
येत्या रविवारपर्यंत राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होईल, असा दावाच दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केलाय. इतकंच नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबतची अधिकृत घोषणा करतील, अशी माहितीही केसरकर यांनी दिलीय.
हे पण वाचा :
आतापर्यंत गुलाब पाहिले, आता काटे पाहा; उद्धव ठाकरेंचा गुलाबरावांसह भाजपवर निशाणा
भारतीय स्टील प्राधिकरणात 200 पदांवर भरती ; या पद्धतीने करा अर्ज?
सर्वसामान्यांसाठी खुशखबर.. अनेक तेलांचे दर घसरले
मंदाकिनी खडसेंसह 11 जणांविरोधात पोलिसांत तक्रार, जळगावात राजकारण तापलं
उदय सामंत यांच्यावरील हल्ला निषेधार्ह आहे. अशा प्रकारचा हल्ला करणं महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत चुकीचं आहे. सामंत यांच्यावरील हल्ला आणि इतर बाबींवर उद्या पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करणार असल्याचंही केसरकर यांनी सांगितलं. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर कोणतंही भाष्य करणार नसल्याचंही केसरकर यांनी सांगितलं.