मुंबई : एकीकडे शिवसेना आणि शिंदे गटाच्या वादावर सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू होती. तर दुसरीकडे जळगावमधील शिवसेनेचे कार्यकर्ते मातोश्रीवर जमा झाले होते. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाहेर येऊन भाषण केलं. यावेळी उद्धव ठाकरेंनी गुलाबराव पाटलांसह भाजपवर निशाणा साधला.
जे मोठे केलेले माझ्या सोबत नसले तरी त्यांना मोठे करणारे माझ्यासोबत आहे, असा हल्ला करतानाच आतापर्यंत त्यांनी गुलाब पाहिले. आता काटे पहा, असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी दिला. गुलाबाचे झाड माझ्याकडे आहे. पुन्हा नवीन गुलाब फुलवीन, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
आता आपल्या दोन तीन पातळीवर लढाई सुरू आहे. रस्त्यावरच्या लढाईमध्ये आपण आता कमी पडणार नाही. कोर्टामध्ये आणखी एक सुनावणी होणार आहे. आता तिसरी लढाई ही कागदाची होणार आहे’ असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाविरोधात तिसऱ्या लढाईचे रणशिंग फुंकले.
‘राजकारणामध्ये हारजीत होत असते. कधी कोण जिंकत असतं, कधी कुणी हारत असतं. पण राजकारणामध्ये कुणी कुणाला संपवण्याची भाषा कधी केली नाही. दुसऱ्याला संपवण्याची भाषा करतो तो आधी संपत असतो. जे नड्डा यांचे भाषण वाचले आहे. इतर पक्षांची घराणेशाही आहे. मी बाळासाहेब ठाकरे यांचा पुत्र आहे. पण भाजपचा वंश नेमका कोणता? सगळे रेडीमेड आहेत. हायब्रीड आहेत.वंश विकत घेतायत, भाजप कोण आहे ? तर त्यांच्याकडे ३०-३० वर्ष दुसऱ्या पक्षात काम केलेले लोक आहेत. त्यांचे स्वताचे काहीच नाही. त्यामुळे त्यांच्याकडे राजकीय वंशच नाही विचारसरणी नाही.अशी टीका उद्धव ठाकरेंनी भाजपवर केली.
हे पण वाचा :
भारतीय स्टील प्राधिकरणात 200 पदांवर भरती ; या पद्धतीने करा अर्ज?
सर्वसामान्यांसाठी खुशखबर.. अनेक तेलांचे दर घसरले
मंदाकिनी खडसेंसह 11 जणांविरोधात पोलिसांत तक्रार, जळगावात राजकारण तापलं
क्या बात है : Royal Enfield ची सर्वात स्वस्त बाईक 7 ऑगस्टला लॉन्च होणार, बघा कशी असेल डिझाईन?
जे मोठे केलेले सोबत नसले तरी त्यांना मोठे करणारे माझ्यासोबत आहे. आतापर्यंत त्यांनी गुलाब पाहिले. आता काटे पहा. गुलाबाचे झाड माझ्याकडे आहे. भाजपला गुलाब दिसत होते त्यांना कळेल की माझ्याकडे झाड होते, त्याचे गुलाब तुम्ही नेले आता काटे तुम्हाला बोचतील. पुन्हा नवीन गुलाब फुलवीन या झाडाला नवे गुलाब येतील, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी गुलाबराव पाटील यांचं नाव न घेता टीका केली.