नवी दिल्ली : मोदी सरकार मुलींसाठी काही योजना चालवीत आहेत. ज्यात सुकन्या समृद्धी योजनेचा समावेश आहे. या योजनेत गुंतवणूक करून पालक आपल्या मुलींचे भविष्य सुरक्षित करू शकतात.सुकन्या समृद्धी योजना ही अशीच एक दीर्घकालीन योजना आहे. यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या मुलीच्या शिक्षणापासून ते लग्नाच्या खर्चासाठी पैसे जोडू शकता. सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत, तुम्ही तुमच्या मुलीच्या नावावर किमान 250 रुपयांचे खाते उघडू शकता. तर या योजनेत वर्षाला जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करता येतात.
खातं कसं उघडायचं?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा बँकेत जाऊन खातं उघडू शकता. सुकन्या समृद्धी योजना 21 वर्षात परिपक्व होते. मात्र, मुलीचं वय 18 वर्षे झाल्यानंतर या खात्यातून शिक्षणासाठी रक्कम काढता येऊ शकते. मात्र 21 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच संपूर्ण रक्कम काढता येते.
सुकन्या समृद्धी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे-
सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत खाते उघडताना मुलीचे जन्म प्रमाणपत्र पोस्ट ऑफिस किंवा बँकेत देणं आवश्यक आहे. तसेच, मुलगी आणि तिच्या पालकांचं ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा आवश्यक आहे.
हे पण वाचा :
भारतीय स्टील प्राधिकरणात 200 पदांवर भरती ; या पद्धतीने करा अर्ज?
सर्वसामान्यांसाठी खुशखबर.. अनेक तेलांचे दर घसरले
मंदाकिनी खडसेंसह 11 जणांविरोधात पोलिसांत तक्रार, जळगावात राजकारण तापलं
क्या बात है : Royal Enfield ची सर्वात स्वस्त बाईक 7 ऑगस्टला लॉन्च होणार, बघा कशी असेल डिझाईन?
गुंतवणुकीवर किती व्याज मिळेल?
सध्या सुकन्या समृद्धी योजनेतील गुंतवणुकीवर 7.6 टक्के दराने व्याज मिळत आहे. या योजनेंतर्गत, थोडीशी गुंतवणूक करून, तुम्ही लाखो रुपये जोडू शकता. सुकन्या समृद्धी योजनेवर बँक किंवा पोस्ट ऑफिसच्या सर्व बचत योजनांपेक्षा जास्त व्याज मिळत आहे. जर तुम्ही या योजनेत दरमहा रु. 1000 पर्यंत गुंतवणूक केली तर 7.6 टक्के व्याजदरानुसार तुम्हाला 10 लाखांपेक्षा जास्त रक्कम मिळेल.
1 महिन्याची जमा -1000 रुपये
12 महिन्यांतील एकूण ठेव- 12000 रुपये
15 वर्षांपर्यंतच्या ठेवींवर -18,0000 रुपये
21 वर्षांसाठी ठेवींवर एकूण व्याज + एकूण ठेव – 329,212 रूपये
21 व्या वर्षी, एकूण ठेव + एकूण व्याज – 10,18,425 रुपये परत मिळतली.