महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अधिवेशनात राज्यभरातील पत्रकारांचा सहभाग
जळगाव- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे जळगाव येथील कांताई सभागृहात 14 वे अधिवेशनात राज्यभरातील पत्रकारांचा सहभाग घेतला. पहिल्या सत्रात मान्यवरांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांनावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी जळगाव जि.प. अध्यक्षा उज्ज्वला पाटिल, जळगाव महापौर सीमा भोळे, माजी आमदार शिरीष चौधरी, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष राजा माने, प्रदेश कार्याध्यक्ष वसंतराव मुंडे, विश्वासराव आरोटे, विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा, अतुल परदेशी, जळगाव जिल्हाध्यक्ष प्रविण सपकाळे, लोकमत निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी , लोकशाहीचे संपादक राजेश यावलकर यांच्यासह राज्यभरातील जिल्हाअध्यक्ष पदधिकारी यांची उपस्थिती होती. अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात मिलिंद कुलकर्णी, राजेश यावलकर, वसंतराव मुंढे, माजी आमदार शिरीष चौधरी यांनी मार्गदर्शन केले. लोकशाहीचा आधारस्तंभ म्हणजे पत्रकारिता असुन पत्रकारिता, पत्रकारांचे संवर्धन करणे प्रत्येकाची जबाबदारी आहे असे माजी आमदार शिरीष चौधरी म्हणाले. माध्यमांचे बदलते स्वरूप याविषयावर भाष्य करताना मिलिंद कुलकर्णी म्हणाले की, डिजीटल माध्यमांमुळे प्रत्येक स्मार्टफोनधारक पत्रकार झाले आहेत. त्यामुळे वास्तव आणि आभास याची आपणास जाणिव झाली पाहिजे. सतत अभ्यास, निरीक्षणातुन समन्वयाची भूमिका घेतली पाहिजे. वादाचे प्रसंग टाळले पाहीजे. अभ्यास, संयम आणि सर्वसमावेशक होऊन संविधानाच्या चौकटीत राहून कार्य केले पाहिजे असे सांगत ज्याप्रमाणे वृत्तपत्रांना आचारसंहिता आहे त्या प्रमाणे ईलेक्र्टोनिक व सोशल मीडीयावर नियंत्रण पाहिजे. राजेश यावलकर यांनी काळानुसार पत्रकारिता बदलत असुन त्यात विश्वासार्हता ही प्रिंट माध्यमांमध्ये आहे.काळानुसार सोशल मीडीयादेखील ही विश्वासार्हता येईल यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहे. वसंतराव मुंढे यांनी पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनदरबारी प्रयत्न केल्याचे सांगितले. दहा हजार कुटुंब सदस्य असलेला पत्रकार संघातील सदस्यांना पत्रकार संरक्षण कायदा पारित करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. सुत्रसंचालन अयाज मोहसीन यांनी केले.