मुक्ताईनगर,(प्रतिनिधी)- नगरपंचायतीच्या तत्कालीन नगराध्यक्षांवर अपात्रतेची कारवाई झाल्यानंतर पद रिक्त झाले होते. तद्नंतर नगराध्यक्ष पदाच्या निवडीचा कार्यक्रम जाहिर झाल्यानंतर बहुमतात असलेल्या शिवसेनेच्या वतीने नगरसेवक पियुष भाउ मोरे यांनी नगराध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन अर्ज दाखल केलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहेबांना समर्थन दिलेले आमदार चंद्रकांतभाऊ पाटिल यांचे ते समर्थक आहेत. त्यामुळे राज्यातील सत्तासमिकरण बदलानंतर ते शिंदे गटाचे पहिले तरुण नगराध्यक्ष ठरल्याचा बहुमान त्यांना मिळालेला आहे. तसेच आमदार चंद्रकांतभाऊ पाटिल यांचा नगराध्यक्ष मुक्ताईनगर नगरपंचायतीवर जवळपास विराजमान झालाच आहे औपचारिकरित्या अधिकृत घोषणा बाकी असल्याने आमदार चंद्रकांतभाऊ पाटील समर्थक व समस्त शिवसैनिकांकडून आनंद व्यक्त होत आहे.
शिवसेना भाजप युती तोडल्याची अधिकृत घोषणा याच मतदार संघातून झालेली असतांना भाजप शिवसेना युतीत मिठाचा खडा टाकण्याचे काम इथेच घडले.
पुढे महाविकास आघाडी पॅटर्न याच मतदार संघात सर्वात अगोदर राबविला गेला तद्नंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. महाविकास आघाडीने सत्तेचा अडीच वर्षाचा टप्पा पुर्ण केल्यानंतर महाविकास आघाडीचे आमदार असलेल्या मुक्ताईनगरात मिठाचा खडा टाकण्याचे काम याच मतदार संघातून केले गेले. त्यानंतर शिवसेनेतून उठाव झाल्यानंतर मुख्यमंत्री पदावर एकनाथ जी शिंदे साहेब विराजमान झाल्यावर शिंदे गटाचा पहिला तरुण नगराध्यक्ष याच मतदार संघातून लाभत असल्याने याला चमत्कार म्हणावा कि योगायोग .? असा प्रश्न विरोधकांना विचार करायला लावत आहे.दरम्यान मुक्ताईनगर नगरपंचायतीचे तरुण नगराध्यक्ष श्री. पियुष भाउ मोरे यांचे आमदार चंद्रकांतभाऊ पाटिल समर्थकांकडून अभिनंदन होतं आहे.