मुंबई : महिन्याच्या सुरुवातीला 1 जुलै रोजी आयात शुल्क वाढवण्याची घोषणा सरकारने केली होती. 30 जूनपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली. आयात शुल्कात वाढ केल्यानंतर सलग तीन दिवस सोन्याच्या दरात वाढ दिसून आली. मात्र चौथ्या व्यवहार दिवसापासून त्यात सातत्याने घसरण होताना दिसत आहे. 15 जुलै (शुक्रवार) हा सलग चौथा व्यवहार दिवस आहे, आज सोने दरात घसरण झाली आहे. आज 24 कॅरेट सोन्याचा नवीनतम दर 50 हजारांच्या जवळ आला आहे. अशा स्थितीत सोने खरेदीसाठी हीच योग्य वेळ असल्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत.
सोन्याची सतत घसरण
व्यावसायिक आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी दुपारी 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 179 रुपयांनी घसरून 50386 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. सरकारने आयात शुल्कात वाढ केल्यानंतर सलग तीन दिवस पिवळ्या धातूचे दर वाढले होते. त्यानंतर त्यात सातत्याने घट होत आहे.
हे पण वाचा :
उद्धव ठाकरेंना धक्का, औरंगाबादसह उस्मानाबादच्या नामांतराला शिंदे सरकारकडून स्थगिती
अधिकारी होण्याची संधी.. MPSC मार्फत 800 पदांची भरती, ही आहे शेवटची तारीख
मम्मी, पप्पी, दादा, सॉरी… हातावरच सुसाईड नोट लिहून महिलेची आत्महत्या
धक्कादायक ! व्हिडीओ तयार करुन २२ वर्षीय तरुणाने घेतला गळफास
चांदीच्या दरात मोठी घसरण
शुक्रवारी दुपारी इंडिया बुलियन असोसिएशनने (https://ibjarates.com) जारी केलेल्या दरानुसार, 24 कॅरेट सोन्याचा भाव 50386 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला. त्याचवेळी एक किलो चांदीच्या दरात मोठी घसरण होऊन तो प्रतिकिलो 54560 रुपयांवर आला.
MCX वर सोने आणि चांदीचे दर
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, शुक्रवारी सोने आणि चांदी दोन्ही लाल चिन्हांसह व्यवहार करताना दिसले. दुपारी दोनच्या सुमारास सोने 0.32 टक्क्यांनी घसरून 50,067 रुपयांवर दिसले. त्याचवेळी चांदीचा भावही 54,629 रुपये प्रतिकिलोपर्यंत घसरला.