मुंबई : सरकार कोसळण्यापूर्वी 29 जून रोजी ठाकरे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक झाली होती. या बैठकीत औरंगाबादचं, उस्मानाबादचं आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळालाच्या नामकरणाला मान्यता देण्यात आली होती. मात्र आता या तिन्ही नामांतराच्या निर्णायाला शिंदे सरकारने स्थगिती दिली आहे.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना २९ जून रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबादचं संभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशीव आणि नवी मुंबईतील विमानतळाला दि.बा.पाटील यांचं नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ठाकरे सरकारच्या इतर निर्णयांप्रमाणं औरंगाबाद,उस्मानाबाद आणि नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाला स्थगिती देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
हे पण वाचा :
मम्मी, पप्पी, दादा, सॉरी… हातावरच सुसाईड नोट लिहून महिलेची आत्महत्या
धक्कादायक ! व्हिडीओ तयार करुन २२ वर्षीय तरुणाने घेतला गळफास
आज राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना IMD कडून अलर्ट जारी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार ठाकरेंची भेट, देऊ शकतात ही ऑफर
देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचं सरकार अल्पमतात असल्यानं आणि राज्यपालांनी बहुमत चाचणीचं पत्र दिल्यानंतर हे निर्णय घेतल्यानं आक्षेप घेतला होता.