मुंबई : महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आजपासून राज्यात पेट्रोल आणि डिझेल दर कमी झाले आहे. काल गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानंतर हे दर कमी झाले आहे. यामुळे जळगावमध्ये आज पेट्रोल 107.60 तर डिझेल 94.03 रुपये प्रति लिटर इतके झाले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्याची मोठी घोषणा केली. त्यानंतर महाराष्ट्रात पेट्रोल प्रति लिटरमागे पाच रुपयांनी तर डिझेल तीन रुपयांनी स्वस्त झाले आहे. महागाईच्या आगीत होरपळणाऱ्या सर्वसामान्यांसाठी हा मोठा दिलासा ठरला आहे. नवे दर आजपासून लागू झाले आहेत.
हे पण वाचा :
आजच्या मंत्रिमंडळात घेतले ‘हे’ महत्वाचे निर्णय
मोठी बातमी ! महाराष्ट्रातील 92 नगरपरिषदांसह 4 नगरपंचायतींच्या निवडणुकांना स्थगिती
विनापरीक्षा ग्रॅज्युएट उमेदवारांना नोकरीचा चान्स, तब्बल 45,000 रुपये पगार मिळेल
नव्या दरानुसार आज राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.35 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 94.28 रुपये एवढा झाला आहे. तर पुण्यात एक लिटर पेट्रोलचा भाव 106.10 रुपये असून एक लिटर डिझेलसाठी 92.58 रुपये मोजावे लागत आहेत. महाराष्ट्र वगळता इतर राज्यात मात्र पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. इतर राज्यात इंधनाच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. राजधानी दिल्लीमध्ये एक लिटर पेट्रोलचा भाव 96.72 रुपये एवढा आहे. तर डिझेलचा दर प्रति लिटर 89.62 रुपये इतका आहे.