मुंबई : आज एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली. या बैठकीत शिंदे-भाजप सरकारकडून जनहिताचे मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. दरम्यान, यावेळी नगराध्यक्ष आणि सरपंच निवडीच्याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. नगर परिषदेच्या निवडणुका आता थेट होणार आहेत. तसेच ग्रामपंचायतीचे सरपंच थेट निवडून येतील. बाजार समितीत शेतकऱ्यांना मतदान (voting) करण्याचा अधिकार बहाल करण्यात आला आहे.
यापूर्वी देवेंद्र फडणवीस सरकारनं थेट सरपंचपदाच्या निवडणुकीचा निर्णय घेतला होता. तो निर्णय उद्धव ठाकरे सरकारनं रद्द केला होता. पण आता शिंदे आणि फडणवीस सरकार आल्यानंतर महाविकास आघाडीने रद्द केला निर्णय पुन्हा एकदा बदला आहे. आता मुख्यमंत्र्याच्या घोषणेप्रमाणे नगराध्यक्ष आणि सरपंच थेट लोकांमधून निवडले जाणार आहेत. इतकेच नाही तर बाजार समितीत शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार (Rights) मिळणार आहे.
हे पण वाचा :
मोठी बातमी ! शिंदे सरकारकडून पेट्रोल-डिझेल दरात कपातीची घोषणा, इतक्या रुपायांनी स्वस्त होणार
स्टंटबाजी करणं भोवले ; गिरणा नदीत उडी घेतलेला तरुण बेपत्ता
तरूणाच्या त्रासाला कंटाळून तरुणीने उचललं टोकाचं पाऊल, पाचोऱ्यातील घटना
राज्यात पावसाचा धुमाकूळ ! आज काय आहे पावसाचा अंदाज? जाणून घ्या
आणीबाणीच्या काळात ज्या लोकांना तुरुंगात राहावं लागलं होतं. अनेक राज्यात पेन्शन दिली जात होती. त्यांना पेशन्शन देण्याचा निर्णय घेतला होता. आम्ही हा निर्णय घेतला होता. पण मागच्या सरकारने तो रद्द केला होता. आम्ही हा निर्णय घेतला आहे. 3600 लोकांना लाभ मिळणार. 1800 अर्ज आले आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत.