मुंबई | राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधीमंडळात जाहीर केल्यानुसार राज्य सरकारने इंधनावरील कर कमी केले आहेत. त्यानुसार राज्यात आता पेट्रोल 5 रुपये आणि डिझेल 3 रुपये प्रति लिटरने स्वस्त झाले आहे. दरम्यान, या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर 10 हजार कोटींचा बोझा पडणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. आज मध्यरात्रीपासून पेट्रोल, डिझेलचे नवीन दर लागू करण्यात आले आहेत.
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर विधानसभेतील विशेष अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पेट्रोल, डिझेल दर आणखी कमी करण्याची घोषणा केली होती. केंद्र सरकारने एक्साईज ड्युटी कमी केल्यानंतर राज्य सरकारने व्हॅट कमी करावा अशी मागणी सातत्याने त्यावेळी विरोधात असलेल्या भाजपकडून करण्यात येत होती. मात्र, त्यावेळी राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारने व्हॅट कमी करण्यास नकार दिला.
हे पण वाचा :
स्टंटबाजी करणं भोवले ; गिरणा नदीत उडी घेतलेला तरुण बेपत्ता
तरूणाच्या त्रासाला कंटाळून तरुणीने उचललं टोकाचं पाऊल, पाचोऱ्यातील घटना
राज्यात पावसाचा धुमाकूळ ! आज काय आहे पावसाचा अंदाज? जाणून घ्या
मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात इंधनावरील दर कमी करण्यात येतील अशी घोषणा केली होती. या निर्णयाला मंत्रीमंडळाच्या बैठकीत पारीत होणे गरजेचे होते. आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदांच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आली. याबाबतची माहिती आज एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.