मुंबई : राज्यात आठवडाभर झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पूरपरिस्थिती पाहायला मिळत आहे. अशात हवामान खात्याकडून आजही अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. आज हवामान खात्याकडून नाशिक, पालघर आणि पुणे जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून मुंबई, ठाणे, उपनगरं, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्यभर पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे राज्यातील अनेक नद्यांच्या आणि धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.
हे पण वाचा :
गिरना नदी काठावरील नागरिकांना सुरक्षिततेचा इशारा
नोकरीच्या शोधात आहात का? कॉन्स्टेबल पदाच्या 1411 जागांसाठी भरती, 69 हजारापर्यंतचा पगार मिळेल
समुद्राची लाट आली अन् तिघांना घेऊन गेली, घटनेचा थरारक Video व्हायरल
जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना प्रशासनातर्फे सतर्कतेचा इशारा, काय आहे नेमका?
या जिल्ह्यांना अलर्ट
पालघर, नाशिक, पुणे या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर नंदूरबार, धुळे, जळगाव. अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, बुलढाणा, अकोला, वाशिम, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या मुसळधार पावसामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. येत्या दोन दिवसामध्ये पावसाचा हा जोर कायम राहण्याची शक्यता असून अनेक ठिकाणच्या शाळा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.