सांगली : जन्म झाला याचा अर्थ मृत्यू अटळ आहे. मात्र तो कधी कसा होईल याचा विचारही कुणी करू शकत नाही. दरम्यान, सांगली जिल्ह्याच्या (sangli) जत तालुक्यातील तीन जणांचा ओमान देशात समुद्राच्या (oman country sea) लाटेत वाहून गेल्याची दुर्देवी घटना घडली. यात अनुक्रमे सहा आणि नऊ वर्षांच्या दोन चिमुकल्यांचा समावेश आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोघेजन वाहून गेल्याचे स्पष्ट दिसत आहे.
मूळचे जत येथील शशिकांत म्हमाणे नोकरी निमित्त दुबईत वास्तव्यास होते.ते येथील एका कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून कार्यरत होते. पत्नी सारिका, मुलगा श्रेयस, मुलगी श्रुती व अन्य एक मुलगी (नाव समजू शकले नाही) यांच्यासह दुबई येथे राहण्यास होते. बकरी ईदमुळे सुट्टी असल्याने मयत शशिकांत, पत्नी, मुले व मित्रांसह दुबई जवळ असलेल्या ओमान या देशात फिरायला गेले होते. त्यावेळी ही घटना घडली आहे.
ओमानमध्ये सांगलीतील तिघे बुडाले pic.twitter.com/xV10MxT9ZJ
— ram rajesh patil (@RamDhumalepatil) July 13, 2022
मृतांचे नावे :
विजय सिद्राम म्हमाणे (वय 45), त्यांची मुलगी श्रुती (वय 9) व मुलगा श्रेयस (वय 6) या तिघांचा ओमान येथील समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. रविवार, दि. 10 रोजी ही घटना घडली असून या घटनेमुळे जत शहरावर शोककळा पसरली आहे.