मुंबई : महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राज्यात शिंदे गट आणि भाजपने सरकार स्थापन केले आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर भेटीगाठीचे सत्र अजूनही सुरूच आहे. याच दरम्यान, आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
उपमुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं होतं. त्यानंतर आपण प्रत्यक्ष भेटून असं फडणवीस यांनी राज ठाकरे यांना सांगितलं होतं. त्यानंतर आज दुपारी दोन वाजता या शिवतीर्थावर जाऊन भेट होणार आहे.
राज ठाकरेंनी फडणवीसांसाठी काय लिहिले होते?
“प्रिय देवेंद्रजी, सर्वप्रथम महाराषट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून आपण जबाबादारी स्वीकारल्याबद्दल आपले मन:पूर्वक अभिनंदन! वाटलं होतं की तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणूनच पुन्हा परताल, परंतु ते व्हायचं नव्हतं. असो…”, असं राज ठाकरे पत्रात म्हणाले.
हे पण वाचा :
अरे बापरे.. भाजपचे श्रीकांत देशमुखांचा महिलेसोबतचा बेडरूमधील VIDEO व्हायरल
अरे बापरे.. ! 59 वर्षीय व्यक्तीचा 12 वर्षांपेक्षा कमी वयाच्या दोन मुलींवर बलात्कार
मोठी बातमी ! राज्यातील 92 नगरपरिषदांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षण नाहीच ; सर्वोच्च न्यायालय
“तुम्ही यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सलग पाच वर्षे काम केले. आताचं सरकार आणण्यासाठीदेखील तुम्ही अपार कष्ट उपसलेत. इतकं असूनही आपल्या मनातील हुंदका बाजूला सारुन, पक्षादेश शिरसावंद्य मानून उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रं हाती घेतलीत. पक्ष, पक्षाचा आदेश हा कुठल्याही व्यक्तीच्या आकांक्षापेक्षा मोठा आहे हे तुम्ही तुमच्या कृतीतून दाखवून दिलं. पक्षाशी बांधीलकी म्हणजे काय असतं त्याचा हा वस्तुपाठच आहे. ही गोष्ट देशातल्या आणि राज्यातल्या सर्व राजकीय पक्षातील आणि संघटनेतील पदाधिकऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कायमस्वरुपी लक्षात ठेवण्यासारखी आहे. खरोखरंंच अभिनंदन!”, अशा शब्दांत राज ठाकरेंनी फडणवीसांचं कौतुक केलं.
“आता जरा आपल्यासाठी. ही बढती आहे की अवनती ह्यात मी जात नाही आणि कुणी जाऊही नये. पण एक सांगतो की, धनुष्यातून ध्येयाचा वेध घ्यायचा तर दोरी मागे ओढावी लागते. यामागे ओढलेल्या दोरीला कुणी माघार म्हणत नाही! तुम्हाला या पुढेही बराच राजकीय प्रवास करायचा आहे”, असं राज ठाकरे म्हणाले.
“एक निश्चित की तुम्ही तुमचं कर्तृत्व महाराष्ट्रापुढे सिद्ध केलेलंच आहे. त्यामुळे देशाच्या भल्यासाठीही तुम्हाला अधिक काम करण्याची संधी मिळो हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना”, असं राज ठाकरे पत्रात म्हणाले होते.