मुंबई : राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाने थैमान घातले असून यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, मनसेचा बुधवारी होत असलेला मेळावा पुढे ढकलण्यात आला आहे. याबाबतची घोषणा मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केली असून एक नवे प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे. पावसामुळे आपण उद्या होणारा मेळावा पुढे ढकलत आहोत, असे राज ठाकरे यांनी सांगितले आहे.
राज्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. असा परिस्थितीत मी उद्या जो कार्यक्रम तुम्हा सर्वांना सांगणार होतो तो सांगितला तरी प्रत्यक्षात आणता येणे अवघड आहे. त्यामुळे आपण उद्या होणारा मेळावा पुढे ढकलत आहोत, असे राज ठाकरे यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांठी मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांचे पत्र.#MNSAdhikrut pic.twitter.com/oDcj7AKehu
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) July 12, 2022
राज ठाकरे यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाल्यामुळे त्यांना डॉक्टरांनी साधारण तीन महिने सक्तीची विश्रांती घेण्यास सांगितले होते. मात्र, सद्य राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला होता. राज ठाकरे लवकरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी ते सद्य राजकीय परिस्थिती आणि आगामी नगरपालिका निवडणुकांसंदर्भात काय बोलणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.