पुणे : राज्यात जून महिन्यात ओढ दिलेल्या पावसाने जुलै महिण्याच्या सुरुवातीपासूनच दमदार हजेरी लावत आहे. मुसळधार पावसाने राज्यातील अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. अशात आता IMD ने महाराष्ट्रातील ५ जिल्ह्यांसाठी १४ जुलैपर्यंत अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांनी हवामानाचा अंदाज घेत घराबाहेर पडण्याच्या सूचना दिल्या आहेत.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील कोल्हापूर, पालघर, नाशिक, पुणे आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी १४ ते १५ जुलैपर्यंत अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्याची राजधानी मुंबईत पुढील तीन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरावर ओडिशा किनारपट्टीवर तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तसेच अरबी समुद्रावर गुजरातपासून उत्तर केरळ किनारपट्टीपर्यंत तयार झालेल्या द्रोणीय स्थितीमुळे मध्य भारत, तसेच राज्यात सध्या पावसाचा जोर कायम आहे. राज्याने जुलैची सरासरी ओलांडली आहे. कोकण, मराठवाड्यातील नांदेड, विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांत अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली.
हे पण वाचा :
मंत्री – संत्री कोणी पण होवो, सगळ्यांचा सातबारा माझ्याकडे, जयंत पाटलांचा थेट इशारा
पुण्यातील मुख्यालय दक्षिणी कमांडमध्ये दहावी,बारावी पाससाठी नोकरीची संधी…
शिपाई महिलेशी करत होता रोमान्स.. पत्नीने रंगेहात पकडले, नंतर काय झालं पहा Video
हवामानाच्या सध्याच्या स्थितीमुळे राज्यातील कोकणातील रायगडमध्ये मंगळवार व बुधवारी, तसेच गडचिरोली, रत्नागिरी व कोल्हापूरमध्ये मंगळवारी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे, तर ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, साताऱ्यामध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.