मुंबई : एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाला शिवसेनेच्या 40 आमदारांनी पाठिंबा दिल्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळली आणि राज्यात शिंदे गट व भाजपचे नवे सरकार स्थापन झाले. दरम्यान अनेक आमदारांना मंत्री पदाची ऑफर असल्याने तिकडे गेल्याचे बोलले जात आहे. सांगली जिल्ह्यातील अनिल बाबर यांनीही एकनाथ शिंदे यांच्यासोबत जात बंडखोरी केली. बाबर यांच्या बंडखोरीमुळे माजी मंत्री जयंत पाटील यांनी त्यांना अप्रत्यक्ष आव्हान दिले आहे.
दरम्यान, सांगली जिल्ह्यातील विट्यानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात जयंत पाटील आढावा बैठक घेण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले कि, मंत्री – संत्री कोणी पण होऊ देत सगळ्यांचा सातबारा माझ्याकडे आहे.
आपण करेक्ट कार्यक्रम करू, महाविकास आघाडीमध्ये सगळ्यांना संधी देण्यात आली आहे. असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री जयंत पाटील यांनी आमदार अनिलराव बाबर यांना दिला.