वाणी सोशल मीडियावरही खूप सक्रिय राहण्याचा प्रयत्न करते. अशा परिस्थितीत ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करून लोकांचे लक्ष वेधून घेते.
आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने तिचा लेटेस्ट लूक चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या फोटोंमध्ये ती नेहमीप्रमाणेच आकर्षक दिसत आहे.
या फोटोशूटसाठी वाणीने क्रॉप टॉपसह हटके पॅन्ट परिधान केली आहे. तिने ग्लॉसी सटल मेकअपसह तिचा लूक पूर्ण केला आहे.
‘शुद्ध देसी रोमान्स’ या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या वाणी कपूरने ‘बेफिक्रे’, ‘चंदीगड करे आशिकी’ आणि ‘बेल बॉटम’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे..
वाणी कपूरचा हा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यावर चाहते लाईक आणि कमेंट करताना दिसत आहेत. वाणी कपूर तिच्या लूक, स्टाईल, ड्रेसिंग सेन्स आणि बोल्डनेससाठी ओळखली जाते.