मुंबई : एकनाथ शिंदेंसोबत एक एक करत जवळपास 39 शिवसेना आमदार गेले. केवळ आमदारच नाही, तर पक्षात विविध जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या कार्यकर्त्यांमध्येदेखील चलबिचल पाहायला मिळत आहे. यात एकनाथ शिंदेंना सहकार्य करणाऱ्या नेते आणि कार्यकर्त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. दरम्यान, अशातच शिवसेनेकडून तानाजी सावंत यांची सोलापूर जिल्हासंपर्क प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.
त्यांच्याजागी संपर्कप्रमुख म्हणून अनिल कोकीळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’त याबाबत निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. यावर आता तानाजी सावंत काय प्रतिक्रिया देतात, हे पाहावे लागेल. काही दिवसांपूर्वीच शिवसैनिकांना तानाजी सावंत यांच्या पुणे आणि सोलापूरमधील कार्यालयांची तोडफोड केली होती. त्यानंतर तानाजी सावंत यांनी शिवसैनिकांना इशारा दिला होता.
हे पण वाचा :
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिंदे गटातील बंडखोर आमदाराला क्लिन चिट
…तर महान कलावंताची महाराष्ट्राला ओळख झालीच नसती ; ‘सामना’तून फडणवीसांवर टीका
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाली विठ्ठल – रुक्मिणीची महापूजा, पंढरपुरात लाखों भक्तांची धाव
Video : भाजपा आमदाराच्या घरासमोर सापडली सोने,चांदीसह पैशांनी भरलेली बॅग
आता मात्र त्यांच्यावर थेट पक्षप्रमुखांनीच कारवाईचा बडगा उगारला आहे. सर्वोच्च न्यायालयात सोमवारी एकनाथ शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय दिला जाणार आहे. यावेळी निकाल एकनाथ शिंदे गटाच्या बाजूने लागल्यास शिवसेनेची अडचण होऊ शकते.