पुणे : गेल्या आठवड्यापासून राज्यात पाऊस सुरु आहे. आता ओडिशावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे राज्यात पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तविला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचीही शक्यता वर्तवली आहे.
बंगालच्या उपसागरात हंगामातील दुसरे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे मोसमी वाऱ्यांचा जोर कायम आहे. दुसरीकडे पश्चिम किनारपट्टीवर दक्षिण गुजरातपासून कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. मध्य भारतावरून जाणारा पश्चिम- पूर्व कमी दाबाचा पट्टा (मान्सून ट्रफ) त्याच्या सर्वसाधारण स्थानापेक्षा दक्षिणेला आहे. या स्थितीच्या प्रभावामुळे राज्यात पुढील पाच दिवस सक्रिय मान्सूनची स्थिती राहील, असे ‘आयएमडी’ने हवामान अंदाजात म्हटले आहे.
हे पण वाचा :
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिंदे गटातील बंडखोर आमदाराला क्लिन चिट
…तर महान कलावंताची महाराष्ट्राला ओळख झालीच नसती ; ‘सामना’तून फडणवीसांवर टीका
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाली विठ्ठल – रुक्मिणीची महापूजा, पंढरपुरात लाखों भक्तांची धाव
Video : भाजपा आमदाराच्या घरासमोर सापडली सोने,चांदीसह पैशांनी भरलेली बॅग
कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे येत्या १३ जुलैपर्यंत राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून, दहा जुलैला रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा; तसेच ११ जुलैला या जिल्ह्यांसह पालघरसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता गृहीत धरून ‘आयएमडी’तर्फे या दोन विभागांना पुढील पाच दिवसांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. मोठ्या पावसाचा परिणाम म्हणून महाराष्ट्र आणि गोव्यातील घाट रस्त्यांवर दरडी कोसळू शकतात, असा इशारा ‘सेंटर फॉर सिटिझन सायन्स’च्या ‘सतर्क’ या उपक्रमांतर्गत देण्यात आला आहे.