मुंबई : शिवसेनेतून बंडखोरी करून बाहेर पडलेले संजय राठोड यांना क्लिन चिट मिळाल्याचे स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना विचारण्यात आलं होतं की, संजय राठोड यांना नव्या सरकारच्या मंत्रिमंडळात घेणार का? यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राठोड यांना पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी क्लिन चिट दिले असल्याचे सांगितले. मात्र त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार की, नाही याबाबत मुख्यमंत्र्यांनी अद्याप काहीच सांगितले नाही.
दिल्ली दौऱ्यात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. आता मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याबाबत खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच माहिती दिली आहे. मंत्रिमंडळ विस्तार आषाढी एकादशी नंतर होणार असल्याची माहिती एकनाथ शिंदेनी दिली आहे. तसेच अधिवेशनाआधी मंत्र्यांचा शपथविधी होईल, असं देखील एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.
हे पण वाचा :
…तर महान कलावंताची महाराष्ट्राला ओळख झालीच नसती ; ‘सामना’तून फडणवीसांवर टीका
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाली विठ्ठल – रुक्मिणीची महापूजा, पंढरपुरात लाखों भक्तांची धाव
Video : भाजपा आमदाराच्या घरासमोर सापडली सोने,चांदीसह पैशांनी भरलेली बॅग
खडसे महाविकास आघाडीत अन्.. गिरीश महाजन यांची टीका
7 फेब्रुवारी 2021 ला पूजा चव्हाणनं पुण्यात राहत्या इमारतीवरुन उडी घेऊन आत्महत्या केली होती. या आत्महत्येप्रकरणी शिवसेनेचे आमदार आणि माजी वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathore) यांचं नाव समोर आलं होतं. या प्रकरणानंतर संजय राठोड यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या प्रकरणी आता पोलिसांनी माजी वन मंत्री संजय राठोड यांना क्लीन चिट दिली आहे.