पंढरपुर- आज आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल आणि रुक्मिणीची विधीवत महापूजा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक लता शिंदे यांच्यासोबत केली.आज पहाटे २ वाजून ५५ मिनिटांनी विठ्ठल रखुमाई यांची शासकीय महापूजा करण्यात आली. मुख्यमंत्र्यासोबत यावेळी बीड जिल्ह्यातील गेवराई येथील मुरली नवले आणि जिजाबाई मुरली नवले हे दाम्पत्य यावर्षीचे मानाचे वारकरी महापूजेसाठी उपस्थित होते.

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला असल्याने आचारसंहिता लागू झाल्यामुळे मुख्यमंत्री शासकीय पूजा करतील की नाही या बाबत अस्पष्टता होती.राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेत, दरम्यान एकनाथ शिंदे दोन दिवसाच्या दिल्ली दौऱ्यावर होते तिथे त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रपती, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. त्यांना विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती भेट दिली. त्यानंतर हा दौरा आटोपून ते शनिवारी रात्री पुण्यात आले. तेथून रात्री लागलीच मोटारीने पंढरपुरात दाखल होतं विठ्ठलाची महापूजा केली.
मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी आज आषाढी वारीतली विठ्ठलाची ही पहिलीच सपत्नीक महापूजा केली. या पूजेपूर्वी त्यांच्या हस्ते ‘पर्यावरणाची वारी-पंढरीच्या दारी’ या अभियानाचा समारोप करण्यात आषाढीवारी च्या निमित्ताने प्रदूषणकारी प्लास्टिक चा वापर टाळूया आणि पर्यावरण रक्षणाचा संकल्प करूया, असे आवाहन मुख्यमंत्री eknath shinde यांनी पंढरपूर येथे आयोजित ‘पर्यावरणाची वारी-पंढरीच्या दारी’ उपक्रमाच्या समारोपप्रसंगी केले. या स्तुत्य उपक्रमास त्यांनी शुभेच्छा दिल्या.
#आषाढीएकादशी निमित्त श्री क्षेत्र #पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणीची मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा करण्यात आली. pic.twitter.com/gkmCGgG4Hk
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 10, 2022