मुंबई : भाजप आमदार आणि नेते प्रसाद लाड यांच्या घरासमोर पैशांनी भरलेली बॅग सापडल्याची आहे. या बॅगेत सोने,चांदी, पैसे आणि देवांच्या मूर्ती हा ऐवज होता. हा प्रकार आज रविवारी पहाटे घडला. दरम्यान, बॅग कुणी ठेवली, कधी ठेवली, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. न्यूज 18 लोकमतने याबाबत वृत्त प्रकाशित केले असून व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे.
सुरक्षारक्षकांनी लाड यांना यासंदर्भात माहिती दिली. माटुंगा परिसरात भाजप (BJP) आमदार प्रसाद लाड यांचं घर आहे. ही बॅग पहाटेच्या सुमारास लाड यांच्या घरासमोर सापडली, सुरुवातीला बॅग ही अनोळखी असल्यानं भीतीचं वातावरण होतं. दरम्यान, याप्रकरणी पोलीस अधिकचा तपास करत आहे. दरम्यान, अशा प्रकारे आमदारांच्या घरासमोर बॅग ठेवल्यानं संशय व्यक्त केला जातंय. दरम्यान, आज आषाढी एकदशी आहे. त्यामुळे अशा प्रकारची बॅग सापडने याकडेही संशयानं बघितलं जातंय.
भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्या घराबाहेर चोरीची बॅग सापडली आहे. #BJPMLA #PrasadLad #MumbaiBJP pic.twitter.com/LmXZWvc77X
— News18Lokmat (@News18lokmat) July 10, 2022
प्रसाद लाड हे काही दिवसांपूर्वीच विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून आले आहेत. ते मुंबई भाजपामधील प्रमुख नेते असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात.