रावेर,(प्रतिनिधी)- स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शासन गरीबांना प्रोत्साहन म्हणून 12 हजार रुपये शासन अनुदान देते या योजनेच्या रावेर पंचायत समितीच्या वैयक्तिक शौचालय प्रोत्साहनपर अनुदान घोटाळ्यातील रावेर पं.स.च्या मुख्य लेखा अधिकाऱ्यांसह सहा जणांना अटक करण्यात आली आहे. हे सर्व जण गेल्या अडीच महिन्यांपासून फरार होते.
अधिकारी लक्ष्मण दयाराम पाटील (५७, रा. स्टेशन रोड, रावेर), तसेच नजीर हबीब तडवी ( ३६), रवींद्र रामू रायपुरे (४६), रुबाब नवाब तडवी (६८), हमीद महेमूद तडवी (४२, सर्व रा. पाडळे बुद्रुक), बाबुराव संपत पाटील (६७, रा. विवरे खुर्द) अशी अटक करण्यात आलेल्या सहा जणांची नावे आहेत.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शासन गरीबांना प्रोत्साहन म्हणून 12 हजार रुपये शासन अनुदान देते. वैयक्तिक शौचालय योजनेत तब्बल दिड कोटींचा भ्रष्टाचार समोर आला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल होता,गरीब जनतेचा पैसा वारेमाप पध्दतीने कोणाच्याही खात्यावर वर्ग केला जात असल्याच्या देखील तक्रारी होत्या यामुळे हे प्रकरण गंभीर होते. अखेर पोलिसांनी सहा कर्मचाऱ्यांना अटक केली आहे.