भुसावळ : धरण क्षेत्रात जोरदार पाऊस कोसळत असल्याने हतनूर धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे आज गुरुवारी सकाळी हतनूर धरणाचे 30 दरवाजे 1 मीटरने उघडले आहेत. हतनूर धरणातून 39200 क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मध्य प्रदेशातल्या तापी नदीच्या उगम स्थानाच्या परिसरात बुधवार झालेल्या पावसामुळे हतनूर धरणातील पाणीसाठी वाढला आहे. उमगस्थानाजवळच्या पावसाचे पाणीही धरणात वाहून आल्याने हतनूर धरण भरले आहे. त्यामुळे आता धरणाचे ३० दरवाजे उघडण्यात आले आहेत. सकाळी ११ वाजेपर्यंत धरणाचे 3० दरवाजे उघडण्यात आले होते.
हे पण वाचा :
नशिराबाद रेल्वे उड्डाणपुलाजवळ पुन्हा अपघात ; बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण जागीच ठार
शिंदे, पवारांच्या भेटीचे फोटो व्हायरल; शिंदेंनी ट्विट करून दिलं हे उत्तर
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, इंटेलिजन्स ब्युरोकडून 766 जागांसाठी भरती जाहीर!
CCTV VIDEO : धक्कादायक ; आईच्या डोळ्यासमोर क्षणात ६ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
४२ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग
जळगाव जिल्ह्यातील हतनुर धरणाचे 30 दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले असून हतनुर धरणातून तापी नदी पात्रात 42 हजार 378 क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाच्यावतीने तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.