मुंबई : गेल्या महिन्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा परीक्षेच्या परीक्षा पद्धतीत आणि अभ्यासक्रमामध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, अशातच आता आयोगाने ट्विट करून या निर्णयामध्ये कोणताही बदल करण्याचा विचार नाही.
काय म्हटलं आहे ट्विटमध्ये
राज्य सेवा मुख्य परीक्षा करिता नवीन परीक्षा योजना व अभ्यासक्रम २०२३ पासून लागू करण्याच्या निर्णयामध्ये कोणताही बदल करण्याचा विचार नाही. काही संघटित अथवा असंघटित घटकांकडून सदर प्रकरणी करण्यात येणारी अवास्तव मागणी आयोगावर दबाव आणण्याचा प्रयत्न समजण्यात येईल.
राज्य सेवा मुख्य परीक्षा करिता नवीन परीक्षा योजना व अभ्यासक्रम २०२३ पासून लागू करण्याच्या निर्णयामध्ये कोणताही बदल करण्याचा विचार नाही. काही संघटित अथवा असंघटित घटकांकडून सदर प्रकरणी करण्यात येणारी अवास्तव मागणी आयोगावर दबाव आणण्याचा प्रयत्न समजण्यात येईल.
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) July 7, 2022
महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC नं परीक्षापद्धतीमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या पद्धतीनुसार मुख्य परीक्षा ही वर्णात्मक म्हणजेच लेखी स्वरूपाची असेल. 2023 साली होणाऱ्या मुख्य परीक्षेपासून हे बदल लागू होतील. लोकसेवा आयोगानं गेल्या महिन्यात याबाबत पत्रक काढून याची माहिती जाहीर केली आहे.
मुख्य परीक्षेत काय बदल?
नव्या नियमानुसार राज्यसेवेची मुख्य परीक्षा वर्णनात्मक असेल आणि एकूण 9 पेपर असतील. त्यातील भाषा पेपर एक मराठी, भाषा पेपर दोन इंग्रजी हे प्रत्येकी तीनशे मार्कांचे विषय प्रत्येकी 25 टक्के गुणांसह अर्हताकारी असतील. तर मराठी किंवा इंग्रजी माध्यम निबंध, सामान्य अध्ययन 1, सामान्य अध्ययन 2, सामान्य अध्ययन 3, सामान्य अध्ययन 4, वैकल्पिक विषय पेपर क्रमांक एक, वैकल्पिक विषय पेपर क्रमांक दोन हे एकूण सात विषय प्रत्येकी 250 मार्कांसाठी असतील.
मुलाखतीसाठी 275गुण असतील. या पद्धतीनं एकूण गुण 2 हजार 25 मार्कांची ही परीक्षा असेल. त्याचबरोबर एकूण 24 वैकल्पिक विषयातून उमेदवारांना एक विषय निवडता येईल. या विषयांची यादी देखील आयोगानं जाहीर केली.