मुंबई : सर्वसामान्यांना पुन्हा महागाईचा फटका बसला आहे. आज सकाळी ऑइल कंपन्यांनी घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत ५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. नव्या दर वाढीनंतर १४.२ किलोचा सिलेंडर 1053 रुपयांवर पोहोचला आहे. पाच किलोचा छोटा सिलेंडरच्या किमतीत १८ रुपयांनी वाढ झाली आहे.
नवे दर आजपासून लागू झाले आहेत. गॅस सिलींडरच्या दराने हजार रुपयांचा टप्पा ओलांडल्याने याचा मोठा ताण आता सर्वसामान्यांच्या खिशावर पडत आहे. दुसरीकडे मात्र व्यवसायिक सिलिंडरचे दर पुन्हा एकदा कमी करण्यात आले आहेत. व्यवसायिक सिलिंडरच्या दरात 8.50 रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे हॉटेल व्यवसायिकांना काहीप्रमाणात दिलासा मिळाला आहे.
तुमच्या शहरातील घरगुती सिलिंडरचे दर जाणून घ्या (सर्व किंमती रुपयांमध्ये)
जळगाव : १०५८
दिल्ली: १०५३
मुंबई : १०५३
कोलकाता: १०७९
चेन्नई: १०६९
लखनौ: १०९१
जयपूर: १०५७
पाटणा: ११४३
इंदूर: १०८१
अहमदाबाद: १०६०
पुणे: १०५६
गोरखपूर: १०६२
भोपाळ: १०५९
आग्रा: १०६६
हे पण वाचा :
CCTV : भुसावळ रेल्वे स्थानकात धावत्या रेल्वेतून उतरणाऱ्या महिलेचा थोडक्यात बचावला जीव; पाहा व्हिडिओ
टप टप बरसा पानी… लेटरने आग लगाई … शिवसेना खासदाराचं उद्धव ठाकरेंना पत्र
पावसामुळे खरिपाचे चित्र बदलले, शेतकऱ्यांनो.. वाचा कृषी विभागाचा सल्ला अन् लागा कामाला ..!
ग्राहकांनो..! नोटा वापराताना काळजी घ्या, नोटांबाबत आरबीआयने महत्वाचे निर्देश जारी
दुसरीकडे 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. त्याची किंमत प्रति सिलेंडर 8.50 रुपयांनी कमी झाली आहे. मात्र, हा दिलासा फारसा नाही. काही दिवसांपूर्वी व्यावसायिक सिलिंडरच्या किमती 198 रुपयांनी कमी झाल्यामुळे मोठा दिलासा मिळाला होता. या निर्णयानंतर राजधानी दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत 2021 रुपयांवर गेली होती. पण आता 8.50 रुपयांच्या आणखी कपातीसह, किंमत 2012 रुपयांच्या जवळ येईल.