राज्याच्या राजकारणात झालेल्या उलथा पालथमुळे आधीच राजकारण तापले आहे, आधीच भाजपाने शिंदे गटाला गळाला लावून शिवसेनेत उभी फूट पाडल्याचा आरोप होतं तर एवढ्या मोठ्या संख्येने आमदार फुटल्याने शिवसेनेत अस्वस्था आहे त्यातच शिवसेनेच्या एका खासदाराने भाजपच्या राष्ट्रपती उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी साकडं घातल्यानं चर्चेचा विषय ठरत आहे. दरम्यान या पत्रामुळे भजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी ‘टीप टीप बरसा पानी… लेटर ने आग लगाई… असं ट्विट करून राजकारण तापवलं आहे.
राष्ट्रपती पदासाठी आदिवासी समाजातील सक्षम आणि कर्तृत्ववान महिला म्हणून शिवसेनेने भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेने पाठिंबा द्यावा अशी लेखी मागणी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. याविषयीचे पत्र शेवाळे यांनी उद्धव ठाकरे यांना दिले असून खासदार शेवाळे यांनी शिवसेना भवनात उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन विनंती पत्र सादर केले आहे.
शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरेंना लिहलेलं संपूर्ण पत्र वाचा…
प्रति,
मा.ना.श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे,
दिनांक: ०५/०७/२०२२.
पक्षप्रमुख, शिवसेना.
विषय: दि. १८ जूलै २०२२ रोजी होणाऱ्या राष्ट्रपती निवडणूकीत मा. श्रीमती द्रौपदी मुर्मू ह्यांना पाठिंबा देण्याबाबत..
आदरणीय उद्धवसाहेब सस्नेह जय महाराष्ट्र !!!
दिनांक १८ जूलै २०२२ रोजी देशाच्या राष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे. हया पदासाठी मा. श्री. यशवंत सिन्हा आणि मा. श्रीमती द्रौपदी मुर्मू हे दोन उमेदवार उभे आहेत. मा. श्रीमती द्रौपदी मुर्मू या आदिवाशी समाजातील असून सामाजिक क्षेत्रात त्यांचे बहुमुल्य योगदान आहे. मा. श्रीमती द्रौपदी मुर्मू हुया राज्याच्या राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी शिक्षिका म्हणून सुरूवात केली व त्यानंतर अरोबिंदो इंटीग्रल एज्युकेशन अॅन्ड रिसर्च इन्स्टीट्यूट, रायगपुर येथे सहाय्यक प्रबंधक म्हणून कामगिरी बजावली आहे. या नंतर त्या ओडीसा सरकारच्या सिंचन विभागात कनिष्ठ सहायक या पदावर कार्यरत होल्या. मा. श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी झारखंडच्या राज्यपाल म्हणून महत्वाची कामगिरी सुध्दा पार पाडलेली आहे.
चंदनीय शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना-भाजप युती असताना एन.डी.ए. च्या उमेदवाराला पाठिंबा न दर्शविता मा. श्रीमती प्रतिभाताई पाटील या महाराष्ट्रातील असल्याकारणाने त्यांना पाठिंबा दर्शविला होता. तसेच मा. श्री. प्रणव मुखर्जी यांना देखील वादनीय शिवसेनाप्रमुखांनी पाठिबा दिला होता,
मा. श्रीमती द्रौपदी मुर्मू ह्यांची पार्श्वभूमी व सामाजिक क्षेत्रातील कार्य लक्षात घेता माझी आपणास नम्र विनंती आहे की, आपण मा. श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा व तसे आदेश सर्व शिवसेनेच्या खासदारांना द्यावेत.
धन्यवाद,
आपला स्नेहांकित,
राहुल रमेश शेवाळे
टप टप बरसा पानी
लेटरने आग लगाई … pic.twitter.com/WjkhVH8ias
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 5, 2022