भुसावळ,(प्रतिनिधी)- भुसावळ रेल्वे स्टेशनवर दिनांक ५ रोजी धावत्या ट्रेनमधून उतरणाऱ्या महिलेचा जीव ड्युटीवर असलेल्या तिकीट चेकिंग स्टाफने वाचवीला असून हा संपूर्ण थरारक प्रकार CCTV मध्ये कैद झाला आहे.घडलेल्या प्रकारनंतर रेल्वे प्रशासने धावत्या रेल्वेतून उतरू नये असे अवाहन करण्यात आले आहे.
धावत्या रेल्वेतून चढू अथवा उतरू नका, असे रेल्वे प्रशासनाकडून वारंवार सांगितले जाते. परंतु गडबडीत असल्याने अनेक प्रवासी आपला जीव धोक्यात घालून रेल्वे प्रवासात चढण्याचा किंवा उतरण्याचा प्रयत्न करतात. हे प्रयत्न अनेक प्रवाशांच्या जीवावर बेतल्याचे आपण पाहिले आहे.असाच प्रकार काल भुसावळ रेल्वे स्थानकावर पाहायला मिळाला.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ रेल्वे स्थानकांवर २२१७७ एक्स्प्रेस गाडी आली होती. या धावत्या रेल्वेतून एका महिलेने उतरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी महिलेचा तोल जाऊन ती खाली रेल्वे प्लॅटफॉर्मवर पडली. मात्र, त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या भुसावळ रेल्वे विभागाचे TTE कर्मचारी शेख अब्दुल इम्रान माजिद Hd TE BSL यांनी आज ट्रेन क्रमांक 22177 मधून आमच्या बहुमोल प्रवाशाचे प्राण वाचवले.
रेल कर्मचारी की तत्परता से बची महिला यात्री की जान!
महाराष्ट्र के भुसावल स्टेशन पर चलती हुई ट्रेन से उतरने के दौरान हादसे का शिकार हुई महिला को ड्यूटी पर तैनात टिकट चेकिंग स्टाफ ने बचाया।
कृपया चलती हुई ट्रेन में ना चढ़ें/उतरें, यह जानलेवा हो सकता है। pic.twitter.com/dSk6aCKwIc
— Ministry of Railways (@RailMinIndia) July 5, 2022