गोंदिया : राज्यात जून महिन्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या. जुलै महिना उजाडेपर्यंत यंदा राज्यात केवळ 60 लाख हेक्टरावर पेरण्या झाल्या होत्या. मात्र गेल्या काही दिवसापासून दडी मारलेल्या पावसाने राज्यात पुन्हा पुनरागम केलं असून यामुळे खरिपाचे चित्र बदलले आहे. 75 ते 100 मिमी पाऊस जिल्ह्यात झाला असून शेतकऱ्यांनी आता भात लागवड केली तरी हरकत नाही. शिवाय ज्या चारसूत्री कार्यक्रमामुळे उत्पादनात वाढ होणार आहे त्याचाच अवलंब करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
दमदार पावसाने शेतजमिनीत ओलावा
आतापर्यंत पुरेशी जमिनीत ओल नसल्याने भात रोवणी झाली तरी धोका कायम अशी स्थिती होती. पण आता विदर्भात सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाला आहे. शिवाय गेल्या दोन दिवसांपासून यामध्ये वाढ झाल्याने भात लागवडीसाठी पोषक वातावरण झाले आहे. जमिनीत पुरेशा ओलावा असल्याने हीच पेरणीची योग्य वेळ असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. विदर्भात पावसामध्ये सातत्य होते पण दोन दिवसांपासून वाढलेला जोर अधिक फायदेशीर ठरणार आहे. आता भात लागवडीला वेग येणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे.
हे पण वाचा :
ग्राहकांनो..! नोटा वापराताना काळजी घ्या, नोटांबाबत आरबीआयने महत्वाचे निर्देश जारी
कुटुंबाची भेट घेऊन कर्तव्यावर परतलेल्या जळगावच्या जवानाला वीरमरण
शिंदे सरकारचा आणखी एक दणका ; ‘या’ कामांना स्थगिती देऊन फेरआढावा घेण्याचे आदेश
10वी पाससाठी उमेदवारांना रेल्वेत नोकरीची संधी…; 56 हजारापर्यंत वेतन मिळेल; याप्रमाणे अर्ज करा
रोवण्या आटोपून घ्या अन् उत्पादन वाढवा
आतापर्यंत पावसाअभावी रोवण्या रखडल्या होत्या तर आता मुसळधार पाऊस होण्यापूर्वी ही शेती कामे आटोपून घ्या असे आवाहन कृषी विभागाला करावे लागत आहे. कारण आगामी पाच दिवसांमध्ये विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पावसाने अधिक प्रमाणात हजेरी लावली तर रोवणीची कामेही खोळंबली जातील. आगोदरच रोवणी कामाला उशीर झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी रोवणी कामे उरकून उत्पादन कसे वाढेल यावर शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.