मुंबई : फाटलेल्या आणि खराब झालेल्या नोटांबाबत आरबीआयने महत्वाचे निर्देश दिले असून आता या चलनी नोटांची फिटनेस टेस्ट होणार आहे. फिटनेस टेस्टमध्ये नापास ठरणाऱ्या नोटा चलनातून बाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांना आता नोटा वापराताना विशेष काळजी घ्यावी लागेल.
या फिटनेस टेस्टनंतर तुमच्याकडील नोट व्यवहारास योग्य आहे की नाही, हे ठरवले जाणार आहे. फाटलेल्या नोटा, सेलो टेपने चिकटवलेल्या नोटा, कोपपे दुमडलेल्या, पाण्यात भिजलेल्या नोटा, धूळ पडलेल्या आणि खराब झालेल्या जीर्ण नोटा, नोटीवर शाईने लिखाण केलेले, ८ चौरस मिलीपेक्षा मोठा छिद्र असलेल्या नोटा व्यवहाराच्या दृष्टीने फिटनेससाठी अयोग्य ठरतील, असे रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे.
हे पण वाचा :
कुटुंबाची भेट घेऊन कर्तव्यावर परतलेल्या जळगावच्या जवानाला वीरमरण
शिंदे सरकारचा आणखी एक दणका ; ‘या’ कामांना स्थगिती देऊन फेरआढावा घेण्याचे आदेश
10वी पाससाठी उमेदवारांना रेल्वेत नोकरीची संधी…; 56 हजारापर्यंत वेतन मिळेल; याप्रमाणे अर्ज करा
पुढचे 4 दिवस राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा
बँकांकडीन नोटा मोजणीचे मशीन, एटीएम यामधून अनेकदा ग्राहकांना देखील फाटक्या, खराब नोटा प्राप्त होतात. त्यामुळे अशा नोटा कोणी व्यावसायिक देखील स्वीकारत नाही. अशा नोटांची छाननी करणे फिटनेस टेस्टमुळे शक्य होणार आहे. ही सर्व कसरत बँकांना करावी लागणार आहे. प्रत्येक तीन महिन्याला बँकांना चलनी नोटांच्या फिटनेस टेस्टचा अहवाल आरबीआयला द्यावा लागणार आहे. सध्या निवडक बँकांमध्ये खराब झालेल्या, फाटलेल्या चलनी नोटा बदलून देण्याची सुविधा सुरु आहे.
नोटांची काळजी कशी घ्याल
१) नोटांची घडी करु नका, कोपरे दुमडू नका.
२) नोटांचा पाणी आणि अग्नीपासून बचाव करा.
३) फाटलेल्या नोटा स्वीकारू नका
४) नोटांना स्टॅपल करु नका.