मुंबई : राज्यात मान्सून पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून पुढचे 4 दिवस राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तविला आहे. कालपासून दक्षिण कोकणात मुसळधार पावसाचा “ऑरेंज अलर्ट” देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील घाटमाथ्यांवर जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. दरम्यान जळगाव जिल्ह्यात देखील रात्रीपासून पाऊस कोसळत असल्याने शेकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
हवामान खात्याने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, बीड, लातूर, जालना, परभणी आणि इतर अनेक भागांसह महाराष्ट्रातील अनेक भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. (काल दि.04) रोजी चिपळूण, रत्नागिरी येथे 5 NDRF च्या तुकड्या तैणात करण्यात आल्या आहेत. तसेच रायगड जिल्ह्यातील महाड आणि रायगड परिसरातही ऑरेंज अलर्ट देण्यात आल्याने त्या भागातही NDRF च्या तुकड्या तैणात करण्यात आल्या आहेत.
जोरदार पावसाचा इशारा
कोकण : ठाणे, मुंबई, पालघर. मध्य महाराष्ट्र : पुणे, सातारा, कोल्हापूर. मराठवाडा : औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड. विदर्भ : अमरावती, यवतमाळ, नागपूर.
विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट)
मराठवाडा : बीड, लातूर, उस्मानाबाद. विदर्भ : बुलडाणा, अकोला, वाशीम, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.