मुंबई : आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर अभिनंदनाचा ठराव विधानसभेत मांडण्यात आला होता. दरम्यान, यावेळी शिवसेनेचे बंडखोर नेते गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांचं नाव न घेता जोरदार हल्ला चढवला. ‘या चार कोंडाळ्यांनी आमच्या उद्धव ठाकरेंना बावळट केलं, त्यांची लायकी नाही, निवडून येण्याची, आमच्या मतावर ते खासदार होत आहे, महिलांना वेश्या म्हणता, हे कोण सहन करणार आहे, असं म्हणत गुलाबराव पाटील (gulabrao patil) यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली.
तसेच आम्ही बंड केला नसून उठाव केला आहे. एकनाथ शिंदे सुरतला गेले होते, ते गेल्यानंतर आम्ही 20 आमदार होतो, साहेबांकडे गेलो होतो. ‘असं शिंदे साहेब म्हणत आहे. त्यांचं ऐकून तरी घ्या’, त्यावेळी तुम्हाला जायचं जायचं तर जा, असं उद्धव ठाकरे म्हणाले. पण असं होत नाही, असा खुलासाच शिवसेनेचे बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांनी केला.
‘आम्हाला जे मिळालं ते बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने केलं आहे. आम्ही बंड केलं नाही तर उठाव केला आहे. आम्ही हिंदुत्त्वाशी तडजोड केली नाही. मला टपरीवर पाठवण्याची धमकी दिली जात आहे. आमचे मुख्यमंत्री हे रिक्षा चालक होते. ज्यांना कुणाला काही करत येत नव्हतं, अशा माझ्या सारखा असंख्य नेते आमदार झाले, ते बाळासाहेब आणि दिघे साहेबांच्या आशिर्वादांमुळे झाले आहे, असं पाटील म्हणाले.
आमची अंत्ययात्रा काढली जाणार आहे. पाच आमदार गेले ठीक आहे. 40 आमदार सोडून जात आहे. अरे 25-25 वर्ष आमदार राहिलेले लोक सोडून जात आहे. मंत्रिपद सोडून जात आहे तरी आमची किंमत नाही. तुम्ही आम्हाला म्हणायला पाहिजे होतं, या चिमण्यानो परत या, मातोश्रीवर या. या चार कंडोळ्यांनी आमच्या उद्धव ठाकरेंना बावळट केलं, त्यांची लायकी नाही, निवडून येण्याची, आमच्या मतावर ते खासदार होत आहे, महिलांना वेश्या म्हणता, हे कोण सहन करणार आहे, असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली.