मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा होतं असतांना शिंदेच्या समर्थनातील शिवसेनेचे बंडखोर काही आमदारांनी गोव्याच्या हॉटेलात झिंगाट डान्स केला असतांनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओ मध्ये आमदार व भावी मंत्री एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री पदी वर्णी लागल्याचा आनंद व्यक्त करतांना दिसत आहे. आनंद व्यक्त करणं वाईट नसलं तरि ज्या पद्धतीने डान्स होतं होता त्यावर विरोधकांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांनी काल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील असे अनपेक्षित पणे पत्रकार परिषदेत जाहीर केल्याने सर्वच अवाक झाले खरे पण राज्यातील भाजप नेत्यांकरिता देखील हा धक्काचं होता. दरम्यान इकडे एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा होताच शिंदे यांच्या समर्थक आमदारांनी गोव्याच्या हॉटेलात डान्स करित जल्लोष केला. दरम्यान यात काही आमदार चक्क टेबलावर चढून नाचत असल्याचं व्हिडिओ दिसून येत होते. हा व्हायरल व्हिडिओ सर्वत्र पोहोचतात समाजाच्या विविध स्तरातून या आमदारांचा निषेध नोंदवला जात आहे. याबाबत मात्र गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी मात्र या प्रकाराचा निषेध केला असून भविष्यात अशी चुक होणार नसल्याचं सांगितलं आहे.
एकनाथ शिंदे यांची राज्याच्या मुख्यमंत्रीपदी वर्णी लागताच हॉटेलमध्ये असणाऱ्या बंडखोर आमदारांनी एकच आनंद जल्लोष साजरा केला.आनंद, जल्लोष साजरा करणं वाईट नसले तरी यावेळी एका आमदारांचा तोल सुटून ते टेबलवर नाचू लागले. मात्र, हे वर्तन योग्य नसल्याने याप्रकरणी या सर्व आमदारांना योग्य ती समज दिल्याचेही केसरकर यांनी सांगितले आहे, सोशल मीडियात मात्र हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.
#eknathshinde MLA celebrating unseen #Hindutva pic.twitter.com/K8kG9Xy0Fs
— Nayan Karekar (@nayan2627) June 30, 2022