मुंबई : महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर २४ तासातच नवीन सरकार स्थापन झालं. गुरुवारी सायंकाळी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर नव्या सरकारमध्ये विधानसभा अध्यक्षपदाच्या शर्यतीत राधाकृष्ण विखे पाटील यांचं नाव चर्चेत असतानाच मात्र एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाकडून मुंबईतील कुलाबाचे भाजपा आमदार राहुल नार्वेकर यांना अध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली आहे.
आज चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत राहुल नार्वेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. विरोधी पक्षाकडून अद्याप या पदासाठी कुणीही अर्ज दाखल केलेला नाहीये. विधानसभेतील भाजप आणि मित्र पक्षांचं संख्याबळ पाहता राहुल नार्वेकर यांची निवड झाली तर ते सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष ठरतील.
हे पण वाचा :
‘या’ निर्णयामुळे उस्मनाबादेत राष्ट्रवादीच्या 40 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
सरकारी बँकेत ‘लिपिक’ पदाच्या तब्बल 6000+ जागा रिक्त ; लगेच करा अर्ज
दिशा पटानीचा लूक बदलला? पाहून चाहते नाराज, म्हणाले..
BECIL मध्ये या पदांसाठी बंपर रिक्त जागा, 12वी ते पदवीधरांना नोकरीचा चान्स
रविवारी ही निवडणूक होणार आहे. सुमारे 170 आमदारांचा पाठिंबा नार्वेकरांना असेल असे मानले जात आहे. राहुल नार्वेकर हे 45 वर्षांचे असून अध्यक्षपदी निवड झाल्यास ते विधानसभेचे आजवरचे सर्वात तरूण अध्यक्ष असतील.